महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिल्या झिनत अमान, आता पडद्यावर करणार पुनरागमन - personal life

झिनत या तब्बल ३० वर्षानंतर आशुतोष यांच्यासोबत काम करत आहेत. या चित्रपटात त्या 'सकीना बेगम'ची भूमिका साकारणार आहे.

वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिल्या झिनत अमान, आता पडद्यावर करणार पुनरागमन

By

Published : Jun 24, 2019, 8:13 AM IST

Updated : Jun 24, 2019, 8:22 AM IST

मुंबई -बॉलिवूड अभिनेत्री झिनत अमान बऱ्याच दिवसांपासून लाईमलाईट पासून दुर होत्या. लवकरच त्या आशुतोष गोवारिकर यांच्या 'पानीपत' चित्रपटातून कमबॅक करत आहेत. या चित्रपटात त्यांची छोटी भूमिका असणार आहे. मात्र, बऱ्याच काळानंतर त्यांना पडद्यावर पाहायला मिळणार असल्यामुळे चाहत्यांना त्यांच्या भूमिकेची उत्सुकता आहे. झिनत या तब्बल ३० वर्षानंतर आशुतोष यांच्यासोबत काम करत आहेत. या चित्रपटात त्या 'सकीना बेगम'ची भूमिका साकारणार आहे.

झिनत अमान

झिनत अमान यांनी आशुतोष यांच्या १९८९ साली 'गवाही' चित्रपटात काम केले होते. त्यांनी अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी लॉस एंजेलिस येथे आपले शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर त्यांना १९७० साली 'मिस आशिया पॅसिफिक'चा किताबही मिळाला होता. त्यानंतर त्यांनी १९७१ साली 'हलचल' चित्रपटातून आपल्या अभिनय करिअरला सुरुवात केली होती. त्यांचे सुरुवातीचे चित्रपट फार यशस्वी ठरले नव्हते. मात्र, नंतर देव आनंद यांच्या 'दम मारो दम' चित्रपटातील त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.

झिनत अमान

या चित्रपटानंतर झिनत यानी मागे वळून पाहिले नाही. ७० च्या दशकात त्यांचा समावेश आघाडीच्या अभिनेत्रीमध्ये झाला. चित्रपटांसोबतच त्यांच्या आयुष्यात काही वादग्रस्त घटनाही घडल्या. त्यांचे वैयक्तिक आयुष्यही चर्चेत राहिले. १९७८ साली त्यांनी संजय खान यांच्यासोबत लग्न केले होते. मात्र, एका वर्षाच्या आतच त्यांनी घटस्फोट घेतला होता.

झिनत अमान

त्यानंतर त्यांनी १९८५ साली मजहर खानसोबत लग्न केले. पुढे त्यांना दोन मुलेही झाली. मात्र, मजहर झिनत यांना मारहाण करायचे. त्यामुळे त्यांनी मजहर यांच्यापासूनही वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यांची दोन मुले अजान आणि जहान आज सिनेसृष्टीतच कार्यरत आहेत. अजान हा चित्रपट दिग्दर्शक आहे. तर, जहान हा लवकरच अभिनेत्याच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

झिनत अमान

तुर्तास झिनत यांना 'पानीपत'मध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. हा चित्रपटही पुढच्या वर्षी प्रदर्शित होईल.

Last Updated : Jun 24, 2019, 8:22 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details