महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

यो यो हनी सिंगच्या आवाजातील 'पागलपंती'चं नवं गाणं प्रदर्शित - Pagalpanti starcast

सोशल मीडियावर सध्या या गाण्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून जॉन बऱ्याच दिवसानंतर कॉमेडी चित्रपटात झळकणार आहे.

यो यो हनी सिंगच्या आवाजातील 'पागलपंती'चं नवं गाणं प्रदर्शित

By

Published : Nov 2, 2019, 5:47 PM IST

मुंबई -अभिनेता जॉन अब्राहमचा आगामी मल्टीस्टारर 'पागलपंती' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा धमाल ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सोशल मीडियावर ट्रेलरला चाहत्यांचा चांगला प्रतिसादही मिळाला. आता या चित्रपटातील यो यो हनी सिंगच्या आवाजातील नवं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.

जॉन अब्राहम, अरशद वारसी, पुलकीत सम्राट, क्रिती खरबंदा, इलियाना डिक्रुज आणि उर्वशी रौतेला यांची मुख्य भूमिका या चित्रपटात पाहायाला मिळणार आहे. 'ठुमका' या नव्या गाण्यात यो यो हनी सिंगच्या आवाजातील धमाल रॅपची जादु पुन्हा अनुभवायला मिळते.

हेही वाचा -जॉन अब्राहम, अर्शद वारसी, अनिल कपूर आणि पुलकित सम्राट यांच्या 'पागलपंती'चे हॅलोविन पोस्टर

सोशल मीडियावर सध्या या गाण्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून जॉन बऱ्याच दिवसानंतर कॉमेडी चित्रपटात झळकणार आहे.

अनीस बज्मी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. यापूर्वी त्यांनी 'वेलकम', 'नो एन्ट्री' आणि 'वेलकम बॅक' यांसारखे सुपरहिट कॉमेडी चित्रपट दिले आहेत. आता 'पागलपंती' चित्रपटातूनही प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा -जॉन-अनिलची 'पागलपंती', 'या' दिवशी प्रेक्षकांना मिळणार पाहायला

सध्या चित्रपटाची टीम प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात अनील कपूर आणि सौरभ शुक्ला यांचीही भूमिका पाहायला मिळणार आहे. २२ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details