नाशिक - 'ये रे ये रे पैसा' चित्रपटाचा पहिला भाग हिट ठरल्यानतंर आता या चित्रपटाचा दुसरा भाग देखील प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. मराठीतील हा बिग बजेट चित्रपट मानला जातोय. या चित्रपटाचे बहुतांश शूटिंग इग्लंड येथे झाले आहे. महागड्या गाड्या, हेलिकॉप्टरचा तामजाम यासोबतच अॅक्शन सिक्वेन्स, दमदार स्टारकास्ट हे सर्वकाही 'ये रे ये रे पैसा २' मध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची संपूर्ण टीम अलिकडेच नाशिक येथे आली होती. यादरम्यान चित्रपटातील कलाकारांशी आमच्या 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनीधीने संवाद साधला.
'ये रे ये रे पैसा २' ची निर्मिती अमेय खोपकर यांनी केली आहे. तर, हेमंत ढोके यांनी या चित्रपटाची दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. कर्ज बुडवून पळून गेलेला उद्योजक आणि त्याचा शोध घेणाऱ्या आण्णा आणि त्यांचे अतरंगी साथीदार यांची ही गोष्ट आहे.