महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

Oscars 2022 : वाचा विल स्मिथने सुत्रसंचालक क्रिस रॉकच्या कानाखाली का लगावली.. - Oscars 2022

क्रिस रॉकने (Chris Rock) विल स्मिथची (Will Smith) पत्नी जाडा पिंकेट स्मिथ जेनची मजा घेतली. जाडाच्या टक्कलपणामुळे तिला या चित्रपट मिळाला आहे. तिला अलोपेसिया या केस गळण्याचा रोग झाला आहे. त्यामुळे तिने केस कापल्याचे सूत्रसंचालक क्रिस रॉकने म्हटले. हे विल स्मिथला न आवडल्याने त्याने क्रिसच्या कानशिलात लगावली.

smith slaps chris
smith slaps chris

By

Published : Mar 28, 2022, 12:37 PM IST

Updated : Mar 28, 2022, 1:00 PM IST

नवी दिल्ली :यंदाच्याऑस्कर 2022 सोहळ्यात अभिनेता विल स्मिथने (Will Smith) शोचा सूत्रसंचालक ख्रिस रॉकला कानशिलात लगावली. प्रेझेंटर क्रिस रॉकने (Chris Rock) विल स्मिथच्या (Will Smith) पत्नीच्या केसांबद्दल कमेंट केली. त्यामुळे विल स्मिथला राग आला. तो स्टेजवर गेला आणि त्याने ख्रिस रॉकला ठोसा मारला.

क्रिस रॉकने विल स्मिथची पत्नी जाडा पिंकेट स्मिथ जेनची मजा केली. जाडाच्या टक्कलपणामुळे तिला हा चित्रपट मिळाला आहे. या चित्रपटासाठी जाडाने तिचे केस कापले नाहीत. ती अलोपेसिया या केस गळण्याचा आजार झाला आहे. आपल्या पत्नीचा सर्वांसमोर झालेला अपमान विल स्मिथला सहन झाला नाही. आणि त्याने क्रिसला मारले.

या घटनेने प्रेक्षकांना बसला धक्का

या घटनेनंतर प्रेक्षक चक्रावले. स्मिथने मारल्यावर ख्रिस रॉक थोडा वेळ तसाच उभा राहिला. विलने त्याला सक्त ताकीद दिली की, माझ्या बायकोचे नाव काढू नकोस. यावर क्रिसने मी अशी गोष्ट करणार नसल्याचे सांगितले. या घटनेने ऑस्कर सोहळ्यातील प्रेक्षकांनाही धक्का बसला. किंग रिचर्ड या चित्रपटासाठी विल स्मिथला यावर्षी ऑस्करमध्ये नामांकन मिळाले होते. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. हा चित्रपट राजा रिचर्डचे वडील रिचर्ड विल्यम्स, टेनिसपटू सेरेना विल्यम्स आणि व्हीनस विल्यम्स यांची कथा आहे. चित्रपटातील त्याच्या कामाचे जगभरातून कौतुक झाले.

हेही वाचा -KGF: Chapter 2 trailer launch : संजय दत्त रवीना टंडन केजीएफ चाप्टर 2 च्या कार्यक्रमासाठी जाणार बंगळूरला

Last Updated : Mar 28, 2022, 1:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details