महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

घराची व्याख्या उलगडणाऱ्या 'वेलकम होम'चा ट्रेलर प्रदर्शित - jitendra joshi

'वेलकम होम' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये घर म्हणजे नेमकं काय, हे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

घराची व्याख्या उलगडणाऱ्या 'वेलकम होम'चा ट्रेलर प्रदर्शित

By

Published : Jun 2, 2019, 12:13 PM IST

मुंबई - प्रत्येक व्यक्तीचं आपलं स्वत:चं एक घर असावं, अशी इच्छा असते. लहान असो किंवा मोठं, प्रत्येकजण आपलं घर आपल्या कल्पकतेने सजविण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र, फक्त चार भिंती बांधल्या की घर तयार होतं का? त्या घरात राहण्यासाठी आपली माणसंदेखील आवश्यक असतात. असाच संदर्भ असलेला 'वेलकम होम' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये घर म्हणजे नेमकं काय, हे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

अभिनेत्री मृणाल कुलकर्णीसह तगडी स्टारकास्ट या चित्रपटात झळकणार आहे. सुमित राघवन, स्पृहा जोशी, सुबोध भावे, जितेंद्र जोशी, प्रसाद ओक, डॉ. मोहन आगाशे, उत्तरा बावकर, सेवा चौहान, सिद्धार्थ मेनन, मिलिंद फाटक, इरावती हर्षे, दीपा श्रीराम, अश्विनी गिरी, रेणुका दफ्तरदार, श्रुती अत्रे, शाल्व किंजवडेकर, प्रांजली श्रीकांत, हे कलाकार यामध्ये भूमिका साकारणार आहेत.

'वेलकम होम'चे पोस्टर

या चित्रपटाचे दिग्दर्शन सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी केले आहे. त्यांचे आत्तापर्यंत बरेच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. मात्र, 'वेलकम होम' या चित्रपटातून त्यांनी घरात राहणाऱ्या व्यक्तींचे नातेसंबध उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.

'वेलकम होम' चित्रपटाची निर्मिती अभिषेक सुनील फडतरे, विनय बेळे, अश्विनी सिधवानी, दीपक कुमार भगत यांनी केली आहे. १४ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details