मुंबई -टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतारीया यांचा 'स्टूडंट ऑफ द ईयर-२' १० मे रोजी प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि ३ गाणी यापूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. आता या चित्रपटातील 'फकीरा' हे नविण गाणं प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्यात टायगर श्रॉफ आणि अनन्या पांडे यांची रोमॅन्टिक बॉन्डिंग पाहायला मिळते.
करण जोहरने 'फकीरा' गाण्याचा व्हिडिओ त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या गाण्याला आत्तापर्यंत ३ लाखापेक्षा जास्त व्हिव्ज मिळाले आहेत. या गाण्याचे बोल अंविता दत्त यांनी लिहिले आहेत. तर, सनम पुरी आणि नीति मोहन यांनी हे गाणे गायले आहे. विशाल-शेखर या जोडीने हे गाणे संगीतबद्ध केले आहे.