मुंबई - नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अचानक गायब होण्याची कथा श्रीजीत मुख्रजी यांच्या 'गुमनामी' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसते. या विषयावरील चित्रपट येत असल्यामुळे नेताजींबद्दल आत्मियता असणाऱ्या सर्वांचीच उत्कंठा वाढणार आहे.
गुमनामी ट्रेलर : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या गुढ मृत्यूची उत्कंठावर्धक कथा - गुढ मृत्यूची उत्कंठावर्धक कथा
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा गुढ मृत्यू भारतीय राजकारणात नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. यावर आधारित गुमनामी हा चित्रपट २ ऑक्टोबरला प्रदर्शित होतोय. याचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
ट्रेलरची सुरूवात १८ ऑगस्ट १९४५ या तारखेपासून होते. यात विमान कोसळल्याचे दृष्य दिसते. त्यानंतर काही प्रश्न उपस्थित होतात. कमीशन स्थापन्याची कार्यवाही झाल्यापासून त्यावर झालेल्या राजकारणाची चर्चा दिसून येते. यात गुमनामी बाबा आणि नेताजी विमानातून उडी मारतानाही दाखवण्यात आले आहे. २ मिनीटांच्या या ट्रेलरमध्ये नेताजींच्या मृत्यूबद्दलच्या तीन कथांची झलक दाखवण्यात आली आहे.
'गुमनामी' या चित्रपटात नेताजी सुभाष चंद्रांची भूमिका प्रोसेनजीत चटर्जी यांनी साकारली आहे. श्रीजीत मुखर्जी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. २ ऑक्टोबरला हा चित्रपट देशभर रिलीज होणार आहे.