मुंबई -बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. अल्पावधीतच ती आघाडीची अभिनेत्री बनली आहे. तिच्या फॅन्स फोलोविंगची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. अलिकडेच तिचा 'ब्रायडल लूक' असलेले काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये नव्या नवरीच्या रुपात असलेली आलिया खूपच सुंदर दिसत आहे.
एका फॅशन डिझायनर हाऊसच्या जाहिरातीसाठी आलियाचा ब्रायडल लूक तयार करण्यात आला होता. आलियाने देखील तिचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करुन तिने 'दुल्हन वाली फिलिंग' असे कॅप्शनही दिले आहे. आलियाच्या ब्रायडल लूकवर तिच्या दागिण्यांनीही चार चांद लावले आहेत.