मुंबई - सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. मात्र, जेवढ्या लवकर एखादी गोष्ट व्हायरल होते, तेवढ्यात गतीने ती भूतकाळात विरुन जाते. मात्र, काही व्यक्ती लक्षात राहण्यासारख्या ठरतात. असंच काहीसं पश्चिम बंगाल येथे राहणाऱ्या राणू मंडल या महिलेबाबत झालं आहे.
लता मंगेशकरांच्या गाण्यामुळे व्हायरल झाली होती 'ही' महिला, कायापालट पाहून व्हाल थक्क! - राणू मंडल
लता मंगेशकर यांचं 'एक प्यार का नगमा है' हे गाणं गाऊन राणू मंडल ही महिला प्रसिद्धीच्या झोतात आली. तिचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिचा पूर्ण मेकओव्हर झालेला पाहायला मिळतोय.
त्याचं झालं असं, की काहीच दिवसांपूर्वी राणू मंडल हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ती लता मंगेशकर यांचं 'एक प्यार का नगमा है' हे गाणं गाताना दिसली होती. तिचा व्हिडिओ समोर आल्यावर नेटकऱ्यांनी तिच्या आवाजाचं भरभरुन कौतुक केलं. हा व्हिडिओ लाखो चाहत्यांनी लाईक केला. तसंच मोठ्या प्रमाणात शेअरही झाला.
सुरुवातीला ओळखताही न येणारी राणू या व्हिडिओमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. तिच्या आवाजामुळे तिला बऱ्याच ऑफर्सही येऊ लागल्या आहेत. आता तिचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओत तिच्यात कमालीचा बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. तिचा संपूर्ण मेकओव्हर करण्यात आलाय. आता लवकरच ती मुंबईत येणार आहे. मुंबईत तिचा आवाज ऐकायला मिळणार आहे.