जागतिक आणि हॉलिवूड सिनेमाचे तंत्र आणि हिंदी आणि भारतीय प्रादेशिक भाषा चित्रपट तंत्र यात तफावत असे. आजच्या घडीला बॉलिवूड चित्रपट तांत्रिकदृष्ट्या जागतिक स्तरावर पोहोचले असले तरी बरेच प्रादेशिक भाषिक चित्रपट अजूनही आधुनिक तंत्रज्ञानापासून वंचित आहेत आणि ही वस्तुस्थिती आहे. हे चित्र, खासकरून मराठी भाषिक चित्रपटांच्या बाबतीतील, बदलण्यासाठी विजय शिंदे यांनी आपला अनुभव वापरण्याचे ठरविले आहे. झी समूहासारख्या नामांकित माध्यम कंपनीत २० वर्षाहून अधिक काळ काम केल्यानंतर, ‘मनोरंजन क्षेत्रासाठी काहीतरी वेगळं केलं पाहिजे’ या जाणीवेतून विजय शिंदे यांनी निर्मीतीचे शिवधनुष्य पेलत नवी इनिंग सुरु केली आहे.
मराठी चित्रपटाच्या यशाचे प्रमाण नेहमीच अपयशी चित्रपटांच्या तुलनेत कमी असते. चित्रपटाच्या अपयशाची अनेक कारणे असतात, त्यापैकी एक म्हणजे निर्मीती व्यवस्थापनाचा योग्य तो समतोल साधता न येणे. चित्रपटाचे निर्मितीमूल्य, तांत्रिक दर्जा जपत ज्या प्रेक्षकांसाठी आपण चित्रपट तयार केला त्यांच्यापर्यंत पोहोचणे अधिक महत्त्वाचे असते. हे लक्षात घेऊन त्यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले. आपल्या अनुभवाच्या शिदोरीवर अल्पावधीतच एकामागोमाग एक सलग अशा चार चित्रपटांची घोषणा केली.
महाराष्ट्राच्या प्रत्येक रसिक प्रेक्षकांची मराठी संगीताशी एक विशेष नाळ जोडलेली आहे. मराठी संगीत रसिकांच्या या अभिरुचीची दखल घेत दर्जेदार आणि उत्तमोत्तम संगीत कलाकृतींची निर्मिती करण्याच्या उद्देशाने विजय शिंदे यांनी आदिती म्युझिक कंपनीची मुहूर्तमेढ रोवली आहे. ‘सोयरीक’, ‘पोरगं मजेतय’, ‘ नाही वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’, ‘हवाहवाई’ या चार मराठी चित्रपटांच्या माध्यमातून निर्माता म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत यशस्वी पदार्पण केले असतानाच आता ‘अदिती म्युझिक कंपनी’ची स्थापना केली आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर ए.एम म्युझिक कंपनीच्या लोगोचे अनावरण करण्यात आले