मुंबई- ज्येष्ठ अभिनेता किशोर नांदलस्कर यांचं आज दुपारी साडेबारा वाजता निधन झाले. काही दिवसांपूर्वीच त्यांना करोनाची लागण झाली होती. ठाण्यातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज त्यांनी रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला.
किशोर नांदलस्कर यांनी रंगभूमीपासून सुरू केलेला प्रवास दूरदर्शन मालिका ते चित्रपट असा दीर्घ होता. मराठीसह हिंदी मालिका, चित्रपट आणि जाहिरात क्षेत्रात त्यांची कारकिर्द गाजली.
किशोर नांदलस्कर यांनी ‘विच्छा माझी पुरी करा’,‘चल आटप लवकर’, ‘भ्रमाचा भोपळा’, ‘पाहुणा’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘भोळे डॅम्बीस’, ‘वन रूम किचन,’ ‘नाना करते प्यार’ अशा गाजलेल्या ४० हून अधिक नाटकातून त्यांनी काम केले. 'खाकी', 'वास्तव', ‘जान जाए पर वचन न जाए’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’, ‘हलचल’, ‘जिस देश में गंगा रहता है’, ‘तेरा मेरा साथ है’, 'सिंघम' यासारख्या गाजलेल्या हिंदी चित्रपटातून त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या होत्या.