मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच अमेरिकेत जाऊन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. नरेंद्र मोदींसाठी अमेरिकेच्या ह्युस्टन 'हाऊडी मोदी' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोदींनी अमेरिकन भारतीय नागरिकांची भेट घेतली. मोदी आणि ट्रम्प यांच्या भेटीचा हा क्षण हजारो नागरिकांनी यावेळी अनुभवला.
अमेरिकन दूतावासाच्या ऑफिशिअयल ट्विटर पेजवर नुकताच एक व्हिडिओ शेअर करण्यात आला. जो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. यामध्ये अमेरिकन दूतावास बॉलिवूडची गाणी गाताना पाहायला मिळतात.