मुंबई - बॉलिवूडची 'रंगीला गर्ल' म्हणजेच उर्मिला मातोंडकर हिचा आज वाढदिवस आहे. एकेकाळी बॉलिवूड चित्रपट गाजवणारी उर्मिला अचानकपणे बॉलिवूडपासून दूर झाल्यामुळे बरेच तर्कवितर्क लावण्यात आले होते. मात्र, बॉलिवूडच्या एका दिग्दर्शकामुळे उर्मिलाने बॉलिवूडला रामराम ठोकल्याचे बोलले जात आहे.
B'day Spl: 'या' दिग्दर्शकामुळे 'रंगीला गर्ल'चा बॉलिवूडला रामराम; अफेअरच्याही गाजल्या चर्चा - ram gopal warma
बॉलिवूडची 'रंगीला गर्ल' म्हणजेच उर्मिला मातोंडकर हिचा आज वाढदिवस आहे.
उर्मिला मातोंडकरने बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. दिग्दर्शक राम गोपाल वर्मासोबत तिच्या रिलेशनशीपच्या चर्चा गाजल्या. राम गोपाल वर्मा यांनी एका चित्रपटात माधुरी दीक्षितला काढून उर्मिलाला साईन केले होते, तेव्हापासून त्यांच्या नात्याच्या चर्चेने जोर धरला होता. उर्मिलासोबत त्यांनी 'रंगीला' चित्रपट बनवला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. यानंतर तिची ओळख 'रंगीला गर्ल' म्हणूनच झाली.
रामगोपाल वर्मामुळे ती यशोशिखरावर पोहोचली होती. मात्र, तिच्या करिअरला उतरती कळाही त्यांच्यामुळेच लागल्याचे बोलले जाते. उर्मिलाने रामगोपाल यांच्यामुळे इतर दिग्दर्शकांच्या चित्रपटात काम करण्यासाठी टाळाटाळ केली होती. इतर दिग्दर्शकांचेही रामगोपालसोबत पटत नसल्यामुळे त्यांनीही उर्मिलाला नंतर लांबच ठेवले. जेव्हा रामगोपालनेही उर्मिलाला चित्रपटात घेणे बंद केले, तेव्हा तिला दुसऱ्या कोणाचा आधार मिळाला नाही. त्यामुळे तिचे करिअर पुर्णत: संपृष्टात आले होते.
चित्रपटापासून दूर झाल्यावर तिने ४२ व्या वर्षी तिच्यापेक्षा ९ वर्षांनी लहान असलेल्या मोहसिन अख्तर मीर या काश्मिरी मॉडेलसोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर तिने सिनेसृष्टीपासून लांब राहणेच पसंत केले.