मुंबई -पंजाबचा सुप्रसिद्ध गायक गुरु रंधावा याच्यावर कॅनडा येथे अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला आहे. कॅनडामध्ये एक शो पूर्ण करून तो बाहेर पडत असताना त्याच्यावर हा हल्ला झाल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर हल्ला करुन मारेकरी फरार झाले.
गुरु रंधावा बॉलिवूडमध्येही लोकप्रिय पॉपस्टार म्हणून ओळखला जातो. आजवर त्याने बरेच सुपरडुपरहिट गाणी बॉलिवूडला दिली आहेत. अल्पावधीतच तो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. त्याचे 'हाय रेटेड गबरु', 'बन जा तू मेरी राणी', 'सूट सूट करदा' ही गाणी विशेष गाजली आहेत. त्यामुळे त्याचे आता जगभरात फॅन्स तयार झाले आहेत.