मुंबई -अभिनेता कुणाल खेमू, रसिका दुग्गल, रणवीर शौरी, आणि विजय राज यांची मुख्य भूमिका असलेला 'लूटकेस' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कुणाल खेमूने अलिकडेच या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला होता. शिवाय चित्रपटातील सर्व कलाकारांची झलकही समोर आली होती. आता या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला आहे.
'लूटकेस'च्या ट्रेलरमध्ये पैशांची सुटकेस शोधण्यासाठी काय काय खेळ रंगतात याची झलक पाहायला मिळते.