महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

माधुरीचा 'टोटल धमाल' ठरला १०० कोटींचा गल्ला पार करणारा पहिला चित्रपट - collection

चित्रपटाने प्रदर्शनानंतर ९ दिवसांतच १०० कोटींचा गल्ला पार केला आहे. विशेष म्हणजे १०० कोटींचा गल्ला गाठणारा हा माधुरीचा पहिला चित्रपट ठरला आहे.

टोटल धमाल

By

Published : Mar 2, 2019, 7:50 PM IST

मुंबई- अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दीक्षित आणि अर्शद वारसीसारखी तगडी स्टारकास्ट असलेला 'टोटल धमाल' चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाच्या निमित्ताने माधुरी दीक्षित आणि अनिल कपूरची जोडी तब्बल १७ वर्षांनी पुन्हा एकदा एकत्र झळकली. या कलाकारांच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा सध्या तुफान प्रतिसाद मिळत आहे.

चित्रपटाने प्रदर्शनानंतर ९ दिवसांतच १०० कोटींचा गल्ला पार केला आहे. विशेष म्हणजे १०० कोटींचा गल्ला गाठणारा हा माधुरीचा पहिला चित्रपट ठरला आहे. तर १०० कोटींचा गल्ला पार करणारा हा अजय देवगणचा ९ वा, रितेश देशमुखचा पाचवा आणि अनिल कपूरचा तिसरा चित्रपट आहे.

लुका छुपी आणि सोनचिडीयाच्या प्रदर्शनानंतरही या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर याचा विशेष परिणाम झाला नाही. इंद्रकुमारद्वारा दिग्दर्शित हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आणखी किती गल्ला जमावणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details