मुंबई -बॉलिवूडमध्ये आजही आपल्या सदाबहार सौंदर्याने सर्वांना भूरळ घालणाऱ्या अभिनेत्रींमध्ये रेखा यांच्या नावाचा समावेश आहे. सदाबहार सौंदर्याची खान आणि तितक्याच दर्जेदार अभिनयाची मोहिनी आजही त्यांच्या चाहत्यांवर आहे. मात्र, फार कमी जणांना माहिती असेल, की अभिनयासोबतच त्यांना गाण्यांचीही आवड आहे. त्यांच्या आवाजाची अशीच मनमोहक झलक असलेला एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्या एक गजल गाताना दिसतात.
'मुझे तुम नजर से गिरा तो रहे हो, मुझे तुम कभी भूला ना सकोगे', असे आर्त स्वर या गजलचे आहे. रेखा यांचा हा व्हिडिओ जुना असला तरीही सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
हा व्हिडिओ १९८३ मधील आहे. लंडन येथे एका माध्यमाच्या मुलाखती दरम्यान रेखा यांनी हे गाणं गायलं होतं. ही गजल सुप्रसिद्ध गजलकार मेहंदी हसन यांची आहे.