मुंबई - तान्हाजी चित्रपटावरून राजकीय वाद सुरू असताना विरोधकांनी चित्रपटाला टॅक्स फ्री कधी करणार, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला होता. मुख्यमंत्र्यांनी तानाजी चित्रपट कार्यक्रमाला जाऊन चित्रपट पाहिला नाही. मंत्रीमंडळासह चित्रपट पाहू, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं, आज अखेर मंत्रीमंडळाने टॅक्स फ्रीला मंजुरी दिली.
तान्हाजी अखेर महाराष्ट्रात टॅक्स-फ्री - Ajay Devgan latest news
महाविकास आघाडीच्या सरकारने आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत 'तान्हाजी - द अनसंग वॉरियर' हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी उत्तर प्रदेश, हरियाणा सरकारने असाच निर्णय घेतला होता. त्यानंतर सरकारकडे तान्हाजी महाराष्ट्रीत टॅक्स फ्री करण्यासाठी आग्रह धरण्यात आला होता.
तानाजी मालुसरे आणि कोंढाणा किल्ल्याचे तत्कालीन सुभेदार उदयभान सिंह राठोड यांच्यात झालेल्या लढाईवरील "तान्हाजी - द अनसंग वॉरिअर" या चित्रपटाला राज्य वस्तू व सेवाकरातून (एसजीएसटी) सवलत देण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली.
या चित्रपटासाठी चित्रपटगृहांनी तिकिटदरावर लागू असलेला राज्य वस्तू व सेवा कर (एसजीएसटी) प्रेक्षाकांकडून वसूल न करता चित्रपटगृहाने स्वत: राज्य शासनाच्या तिजोरीत भरणार आहे. शासन आदेशाच्या दिनांकापासून 30 एप्रिल 2020 पर्यंतच्या कालावधीतील तिकिट विक्रीवरील राज्य वस्तू व सेवा कराचा परतावा आता राज्य सरकार देणार आहे.