महाराष्ट्र

maharashtra

इशान खट्टर म्हणतो 'या' अभिनेत्रीसोबत ऑनस्क्रिन रोमान्स करणे सोपे

By

Published : Jan 10, 2020, 11:45 PM IST

अभिनेत्री तब्बू यांच्यासोबत ऑनस्क्रिन रोमान्स करण्याबाबत अभिनेता इशान खट्टरने आपलं मत व्यक्त केलंय. या दिग्गज अभिनेत्रीसोबत रोमान्स करणे सोपे असल्याचे त्याने म्हटलंय.

Tabbu, Ishaan Khatter
तब्बू, इशान खट्टर

मुंबई - अभिनेत्री तब्बूसोबत ऑनस्क्रिन रोमान्स करणे सोपे होते असे इशान खट्टरने म्हटले आहे. मिरा नायर यांच्या आगामी 'ए सुटेबल बॉय' या चित्रपटात तो तब्बूसोबत काम करीत आहे.

ऑनस्क्रिन रोमान्स करणे सोपे कसे असल्याचे सांगताना इशान म्हणाला, ''कारण त्या तब्बू आहेत. त्या असताना तुमचे निम्मे काम सोपे होते. हे मी अगोदरही सांगितलंय. कारण त्या व्यक्तीरेखेमध्ये एकदम समरस होऊन जातात. लोकांनी सईदाबाई पाहावा यासाठी मी उत्सुक आहे.''

आपलं मन तब्बू यांना भेट देण्यास सांगत असल्याचेही इशानने सांगितले. गालिब यांच्या कवितांची पुस्तक भेट देणार असल्याचेही तो म्हणाला.

'ए सुटेबल बॉय' या चित्रपटात इशान मान कपूर ही व्यक्तीरेखा साकारत आहे. महेश कपूर या राजकीय नेत्याच्या बंडखोर मुलाची भूमिका तो साकारत आहे. सईदाबाई या रुपवान स्त्रीच्या सौंदर्यावर तो भुलतो, अशी इशान साकारत असलेली व्यक्तीरेखा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details