मुंबई -चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी आणि सई देवधर यांची जोडी असलेला 'मोगरा फुलला' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नेहमीच चॉकलेट बॉयची भूमिका साकारणाऱ्या स्वप्नीलने या चित्रपटात मात्र, एका मध्यमवर्गीय तिशी पार केलेल्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे. अत्यंत भावनिक आणि नात्यांची गुंफण असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने तीनच दिवसात चांगला गल्ला जमवला आहे.
सिनेमागृहात स्वप्नील जोशीचा 'मोगरा' फुलला; ३ दिवसात केली 'इतकी' कमाई - स्वप्नील जोशी
स्वप्निल जोशीसोबत पहिल्यांदाच सई देवधर या अभिनेत्रीने भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील त्याच्या वेगळ्या लूकचीही चर्चा सोशल मीडियावर रंगली. गाण्यांनाही सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळाला.
१४ जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ३७.५ लाख इतकी कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ५६.२ लाख तर, तिसऱ्या दिवशी ५१.५ लाख इतकी कमाई केली आहे. त्यामुळे तीनच दिवसात या चित्रपटाने १ कोटी ४५ लाख इतका गल्ला जमवला आहे. प्रेक्षकांचा मिळणारा चांगला प्रतिसाद पाहता या चित्रपटाचे शो देखील वाढवण्यात आले आहे.
स्वप्निल जोशीसोबत पहिल्यांदाच सई देवधर या अभिनेत्रीने भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील त्याच्या वेगळ्या लूकचीही चर्चा सोशल मीडियावर रंगली. गाण्यांनाही सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे खऱ्या अर्थाने चित्रपटगृहात स्वप्नील जोशीचा 'मोगरा फुलला' असं म्हटलं, तर वावगं ठरणार नाही.