मुंबई -बॉलिवूडचे बरेच कलाकार मालदीव येथे सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसतात. सध्या अभिनेत्री सुष्मिता सेनही मालदीव येथे सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. तिने तिथल्या समुद्रकिनाऱ्यावरचा एक व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिचा रोमॅन्टिक अंदाज पाहायला मिळतो.
सुष्मिता तिच्या दोन्ही मुली आणि रोहमनसोबत मालदिव येथे गेली आहे. ती तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. तिच्या आणि रोहमन शॉल यांच्या नात्याचीही चर्चा होत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या नात्याची कबुली फार पूर्वीच दिलेली आहे. तेव्हापासून दोघांचेही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.
हेही वाचा-आयुष्मानवर बॉलिवूड कलाकारांच्या शुभेच्छांचा वर्षाव, 'अशा' दिल्या शुभेच्छा