महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

मातीतल्या अस्सल खेळाची रांगडी गोष्ट 'सूर सपाटा'

सूर सपाटाची टीम सध्या प्रमोशनमध्ये बिझी झालीय. दिग्दर्शकांसह कलाकारांची टीम नाशिकात पोहोचली होती. यावेळी त्यांना सिनेमाचा होतु समजावून सांगितला.

सूर सपाटा'

By

Published : Mar 7, 2019, 9:00 PM IST


नाशिक - सूर सपाटा हा अस्सल मातीतल्या खेळाची गोष्ट सांगणारा चित्रपट आहे. कबड्डी खेळणाऱ्या मुलांची ही गोष्ट आहे.गुरुवार दिनांक २१ मार्चला हा चित्रपट भेटीस येणार आहे. यापूर्वी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता.

लाडे ब्रदर्स निर्मित आणि दिग्दर्शक मंगेश कंठाळे दिग्दर्शित ''सूर सपाटा'ही एका शाळेतील विद्यार्थ्यांची कथा आहे. कबड्डीत हुशार पण अभ्यासात 'ढ' असलेल्या या मुलांनी एक आंतरशालेय कबड्डी स्पर्धा मोठ्या जिद्दीने जिंकण्याची ही गोष्ट आहे.

उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, आभिज्ञा भावे, नेहा शितोळे, संजय जाधव यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. संजय जाधव हे पहिल्यादा नकारात्मक भूमिका साकारत आहेत. त्यांच्याशिवाय ७ नवोदित कलाकार मुख्य भूमिकेत दिसतील.

कबड्डीचा खेळ नक्की आयुष्यात कसा बदल घडवतो आणि आयुष्याला कशी नवी दिशा देतो ते या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

सूर सपाटा

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details