मुंबई - भारतात असंख्य लोकनृत्ये लोकप्रिय आहेत. यापैकीच एक डान्स म्हणजे भांगडा. प्रत्येक पंजाबी कुटुंबामध्ये या नृत्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. कोणताही आनंदाचा प्रसंग असो पंजाबी लोक याच भांगड्यावर वेडे होऊन नाचतात. याच भांगडा नृत्याची जुगलबंदी अभिनेता सनी कौशलच्या 'भांगडा पा ले' या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
रॉनी स्कूवालाच्या आरएसव्हीपी या निर्मिती संस्थेने 'भांगडा पा ले'ची निर्मिती केली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये भांगडा हा डान्स आंतरराष्ट्रीय डान्स स्पर्थेत नेऊ पाहणाऱ्या दोन तरुण जोडप्याची ही रंजक कथा आहे. यात भरपूर इमोशन्स, युध्दाची पार्श्वभूमी आणि पंजाबी परिवार यांची संवेदनशील गोष्ट मांडण्याचा प्रयत्न ट्रेलरमध्ये दिसून येतो.
हेही वाचा -६६ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा, वाचा विजेत्यांची यादी