मुंबई - सनी देओल आणि अमिशा पटेल यांच्या करिअरमधला सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'गदर' चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, 'गदर'च्या सिक्वेलवर १५ वर्षांपासून काम सुरू आहे. गदरच्या सिक्वेलमध्येही तारा (सनी देओल), सखीना (अमीशा पटेल) आणि जीत यांची कथा दाखवण्यात येणार आहे.
सनी देओलच्या ब्लॉकबस्टर 'गदर'चा येणार सिक्वेल, तयारी सुरू - sequel
२००१ साली 'गदर' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम रचले होते. त्यामुळे 'गदर' चित्रपटाचाही सिक्वेल तयार करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.
सध्या बॉलिवूडमध्ये बऱ्याच चित्रपटाचे सिक्वेल तयार करण्याचा ट्रेण्ड सुरू आहे. अनेक सिक्वेल आत्तापर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. २००१ साली 'गदर' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम रचले होते. त्यामुळे 'गदर' चित्रपटाचाही सिक्वेल तयार करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.
एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, या सिक्वेलबाबत सनी देओलसोबत चर्चाही करण्यात आली आहे. 'गदर' चित्रपटाचे दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केले होते. अनिल शर्मा यांनी सनी देओलसोबत आत्तापर्यंत बरेचसे चित्रपट केले आहेत. अशात त्यांचे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले. त्यामुळे 'गदर' सिक्वेलकडून त्यांना फार अपेक्षा आहेत. त्यामुळे 'गदर'प्रमाणेच त्याच्या सिक्वेललाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो का, हे पाहणे महत्वाचे ठरेल.