महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'किंग खान'च्या लेकीचं ग्रॅज्युएशन पूर्ण, शाहरुखने शेअर केला खास फोटो - gauri khan

सुहानालादेखील शाहरुखप्रमाणेच चित्रपटसृष्टीत नाव कमवायचे आहे. तिच्या बॉलिवूड पदार्पणाच्याही चर्चा सुरू आहेत. अलिकडेच तिने एका शॉर्ट फिल्मचे शूटिंग पूर्ण केले आहे.

'किंग खान'च्या लेकीचं ग्रॅज्युएशन पूर्ण, शाहरुखने शेअर केला खास फोटो

By

Published : Jun 29, 2019, 11:23 AM IST

मुंबई - बॉलिवूडचा 'किंग खान' शाहरुखची मुलगी सुहाना हिने तिचे ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. तिच्या या यशासाठी शाहरुखने सोशल मीडियावर एक खास संदेश लिहिला आहे. 'आता नव्या जगात तुझे स्वागत आहे', असे लिहून त्याने गौरी आणि सुहानासोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

शाहरुखने सुहानासोबतचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो देखील शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघांच्याही चेहऱ्यावरचा आनद स्पष्टपणे दिसून येत आहे. 'तुझ्या समोरच्या आयुष्यातील नव्या रंगासाठी आणि आणखी अनुभव जोडण्यासाठी तुला शुभेच्छा', असे कॅप्शन त्याने या फोटोवर दिले आहे.

गौरीनेही सुहानाचा एक व्हिडिओ शेअर करुन सुहानाचे अभिनंदन केले आहे. या व्हिडिओमध्ये सुहाना तिचा पुरस्कार घेऊन स्टेजवरुन खाली उतरताना दिसत आहे. सुहानाला नाटकांमध्ये विशेष योगदान दिल्यामुळे तिला हा पुरस्कार मिळाला आहे.

सुहानाला देखील शाहरुखप्रमाणेच चित्रपटसृष्टीत नाव कमवायचे आहे. तिच्या बॉलिवूड पदार्पणाच्याही चर्चा सुरू आहेत. अलिकडेच तिने एका शॉर्ट फिल्मचे शूटिंग पूर्ण केले आहे. आता तिच्या बॉलिवूड पदार्पणाकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details