महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

झांसीत शूटींग करणाऱ्या स्पृहा जोशीला वेध लागलेत थेट खेड्या-पाड्यात परतण्याचे - Zansi

अभिनेत्री स्पृहा जोशी लवकरच महाराष्ट्रात श्रमदानासाठी परतणार आहे. सध्या ती झांसीमध्ये शूटींग करीत आहे. पाणी फाउंडेशनचा वॉटर कप स्पर्धा सुरु होत असून यात सहभागी होण्याचा पुन्हा एकदा निर्धार स्पृहाने केलाय.

स्पृहा जोशी करणार श्रमदान

By

Published : Apr 17, 2019, 4:33 PM IST

अभिनेत्री स्पृहा जोशी सध्या झांसीमध्ये आपल्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. मात्र हे चित्रीकरण या आठवड्याअखेरीस आटोपून ती लवकरच परतणार आहे आणि पाणी फाउंडेशनच्या श्रमदानात आमिर खान आणि इतर मराठी कलाकारांसह सहभागी होणार आहे.

सूत्रांनुसार, स्पृहा जोशी गेल्यावर्षी पुरंदर तालुक्यातल्या पोखर ह्या गावात श्रमदानासाठी गेली होती. श्रमदानाशिवायही पाणी फाउंडेशनच्या वर्षभर होणाऱ्या कार्यक्रमांना स्पृहा सक्रिय सहभागी होती.

अभिनेत्री स्पृहा जोशी 1 मे रोजी श्रमदानासाठी जाणार आहे. ती गेल्यावर्षीच्या अनुभवाविषयी सांगते, “मुंबई-पुण्यातल्या सुखासीन आयुष्याच्या बाहेर भयावह परिस्थितीत पाण्यासाठी वणवण करणाऱ्या लोकांची आयुष्य पाणी फाउंडेशनच्या मोहिमेमुळे मला पाहायला मिळाली. पाणी फाउंडेशनसोबत, दुष्काळाशी दोन हात करताना, पक्षीय राजकारणाच्या पलिकडे जाऊन संघटित होणारे, जातव्यवस्था निर्मुलन होऊन, एकमेकांमधले पिढ्यान् पिढ्यांचे मतभेद विसरून, एकत्र पंगतीला बसणारे गावकरी मी पाहिलेत. मोठ्या शहरात राहणारी सुखवस्तू कुटूंबातली उच्चशिक्षित मुलं, गावात येऊन कुदळ-फावडे घेऊन उन्हात घाम गाळताना पाहताना, इंडिया भारतात परतल्याचा सुखद अनुभव मिळतो.”

स्पृहा पूढे सांगते, “पाणी फाऊंडेशनची मोहिम आता चळवळ झालीय. पाणी फाउंडेशनसाठी काम करताना नैसर्गिक आपत्तीवर आपण मात करण्याचा आनंद गावकऱ्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर मला दिसून आलाय. या आनंदात मीही सहभागी असल्याचे समाधान काही आगळेच असते. गेल्यावर्षी मी एकटीच श्रमदानासाठी गेले होते. पण यंदा मी माझ्या आई आणि काकूसोबत श्रमदानात सहभागी असेन.”

ABOUT THE AUTHOR

...view details