महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'दबंग'ची रज्जो परतली, पाहा सोनाक्षीची घायाळ करणारी झलक - social media

इंदौर येथे 'दबंग-३' च्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. प्रभूदेवा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. सेटवरील बरेचसे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

'दबंग'ची रज्जो परतली, पाहा सोनाक्षीची घायाळ करणारी झलक

By

Published : Apr 4, 2019, 9:16 PM IST

मुंबई - 'थप्पड से डर नही लगता साहब, प्यार से लगता है' या संवादाने 'दबंग'मधून चाहत्यांना घायाळ करणारी 'रज्जो' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'दबंग' आणि 'दबंग-२' मधून सोनाक्षी सिन्हा 'रज्जो'च्या भूमिकेत पाहायला मिळाली. आता याच चित्रपटाच्या तिसऱया भागाचेही शूटिंग सुरु झाले आहे.


सलमान खानच्या लूकनंतर चाहत्यांना सोनाक्षीच्या लूकची उत्सुकता होती. आता सोनाक्षीनेही एक फोटो शेअर करुन चाहत्यांना ती त्याच रुपात परत येत असल्याची माहिती दिली आहे.


इंदौर येथे 'दबंग-३' च्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. प्रभूदेवा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. सेटवरील बरेचसे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नर्मदा नदीच्या घाटावरही बरेचसे सीन शूट करण्यात येणार आहेत.
'दबंग-३'पूर्वी सोनाक्षी सिन्हाचा 'कलंक' चित्रपटही प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटात ती आदित्य रॉय कपूरसोबत झळकणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details