महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'दबंग गर्ल'च्या हातात बेड्या?, वाचा काय आहे व्हिडिओचं सत्य - खानदानी शफाखाना

सोनाक्षी सिन्हावर काही दिवसांपूर्वी फसवणूकप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचं वृत्त समोर आलं होतं. एका स्टेज शोसाठी पैसे घेऊनही शो केला नसल्याचा तिच्यावर आरोप होता.

'दबंग गर्ल'च्या हातात बेड्या?, वाचा काय आहे व्हिडिओचं सत्य

By

Published : Aug 6, 2019, 8:28 PM IST

मुंबई -बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही काही दिवसांपासून 'खानदानी शफाखाना' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसे यश मिळत नाही. मात्र, आता पुन्हा ती एका कारणामुळे चर्चेत आली आहे.

सोनाक्षी सिन्हावर काही दिवसांपूर्वी फसवणूकप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचं वृत्त समोर आलं होतं. एका स्टेज शोसाठी पैसे घेऊनही शो केला नसल्याचा तिच्यावर आरोप होता. नंतर ट्विटरच्या माध्यमातून सोनाक्षीने हे सर्व आरोप फेटाळलेसुद्धा होते. मात्र, आता तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार ट्रेण्ड होत आहे. या व्हिडिओत सोनाक्षीच्या हातात बेड्या पाहायला मिळत आहेत. त्यामुळे तिला अटक करण्यात आली की काय, अशा चर्चा सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

या व्हिडिओत सोनाक्षी काहीशी त्रासलेली दिसतेय. मला अशाप्रकारे तुम्ही अटक करु शकत नाही. मी कोण आहे तुम्हाला माहित नाही. मी काहीच चुकीचं केलं नाही, असं ती या व्हिडिओत म्हणताना दिसते.

या व्हिडिओमुळे चाहतेही बुचकळ्यात पडले आहेत. मात्र, सोनाक्षीने आणखी एक पोस्ट शेअर करुन लिहिले आहे, की 'एकिकडे हा व्हिडिओ खरा आहे की खोटा हे जाणून घेण्यासाठी बरेच जण उत्सुक आहेत. होय, या व्हिडिओत मीच आहे. पण, या व्हिडिओत पूर्ण सत्य दाखवण्यात आले नाही. मी तुमच्यासोबत सर्वकाही लवकरच शेअर करेल'.

सोनाक्षी सिन्हाची पोस्ट

ABOUT THE AUTHOR

...view details