मुंबई - मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर हिने नेहमीप्रमाणेच यावर्षीही आपला वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला आहे. मराठीसोबतच हंटरसारख्या हिंदी चित्रपटातूनही आपली ओळख निर्माण करणारी सई सामाजिक कार्यातही सक्रीय आहे. अनेकदा ती आपल्या सोशल मीडियावरून सामाजिक विषयांवर भाष्य करत असते. सईच्या सामाजिक कार्यात तिचे चाहतेही अनेकदा हातभार लावत असतात. माहराष्ट्र दिनीदेखील सई श्रमदान करताना दिसली होती.
सईनं गरजूंना मदत करत साजरा केला वाढदिवस - birthday
पंचतारांकित हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करून पैसे वाया घालवण्यापेक्षा ते पैसे सामाजिक कामात लावलेले अधिक चांगलं असल्याचं सई मानते. त्यामुळेच ती दरवर्षी आपला वाढदिवस सामाजिक काम करत साजरा करते.
दरवर्षी आपल्या वाढदिवशी म्हणजेच २५ जूनला सई सामाजिक कार्य करत गरजू मुलांना मदत तसेच झाडे लावताना दिसते. गेल्या ३ वर्षांपासून आपल्या प्रत्येक वाढदिवसाला सई ही मदत करत आहे. यावर्षीही तिने १०० गरजू मुलांना वही, पेन आणि पुस्तकं यांचं वाटप केलं, यासोबतच पुण्यातील काही गरिबांना तिनं खाद्यपदार्थांचं वाटपही केलं आहे.
पंचतारांकित हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करून पैसे वाया घालवण्यापेक्षा ते पैसे सामाजिक कामात लावलेले अधिक चांगलं असल्याचं सई मानते. त्यामुळेच ती दरवर्षी आपला वाढदिवस अशा पद्धतीने साजरा करते.