मुंबई -आपल्या सशक्त अभिनयानं सिनेसृष्टी गाजवणारी अभिनेत्री स्मिता पाटील यांचा आज जन्मदिवस आहे. आपल्या अभिनयासोबतच सौंदर्याने सर्वांवर छाप पाडणाऱ्या अभिनेत्रींमध्ये स्मिता पाटील यांचं नाव अग्रस्थानी होतं. स्मिता पाटील या सौंदर्यांचे निकष बदलणाऱ्या अभिनेत्रींमध्ये गणल्या गेल्या. अवघ्या १० वर्षांच्या सिनेकारकिर्दीतील त्यांचं आयुष्य बऱ्याच घटनांमुळे चर्चेत राहिलं. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात हे काही किस्से...
स्मिता पाटील यांचा जन्म १७ ऑक्टोंबर १९५६ साली झाला होता. स्मिता यांच्या व्यावसायिक आयुष्याप्रमाणेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचीही लाईमलाईटमध्ये चर्चा झाली. विशेषत: अभिनेते राज बब्बर यांच्यासोबत त्यांच्या नात्याची बरीच चर्चा झाली.
असं पडलं 'स्मिता' हे नाव -
स्मिता पाटील यांच्या नावामागेही एक किस्सा आहे. त्यांची आई विद्याताई पाटील यांनी स्मिता यांच्या सुंदर हास्यामुळे त्यांचं नाव 'स्मिता' असं ठेवलं होतं. पुढे हेच नाव त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसं ठरलं. तसंच, त्यांचं हास्यदेखील त्यांच्या सौंदर्याचा अविभाज्य घटक बनला.
स्मिता त्यांच्या गंभीर अभिनयामुळे ओळखल्या जात असत. मात्र, फार कमी लोकांना माहिती असेल, की पडद्यावर गंभीर भूमिका साकारणाऱ्या स्मिता या खऱ्या आयुष्यात मात्र, खूप मस्तीखोर होत्या.स्मिता यांनी साकारलेले चित्रपट त्यांच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरले. त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये 'मंथन', 'मिर्च मसाला', 'अर्थ', यांसारख्या चित्रपटांचा विशेष उल्लेख केला जातो.
हेही वाचा -दिवाळीत उलगडणार 'अंकुश-शिवानी-पल्लवी'च्या मिसकॉलवाल्या मैत्रीचे रहस्य