महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'वेडिंगचा शिनेमा'साठी ऑनलाइन ऑडिशनद्वारे झाली गायकांची निवड - sourabh shirsath

“कुनीबी कसबी घालुदे पिंगा, बाशिंगाचा कळतोच इंगा” असे बोल असलेले हे गाणे आहे. सलील कुलकर्णी यांनी हे बोल फेसबुकच्या माध्यमातून गेल्या आठवड्यात ऑनलाइन टाकले होते

सौरभ शिरसाठ आणि कोल्हापूरची स्वरूपा बर्वे यांची निवड

By

Published : Mar 22, 2019, 10:27 AM IST

मुंबई- मराठी चित्रपटांमध्ये अनेक नवनवे प्रयोग गेल्या काही वर्षांमध्ये होत आहेत. पण प्रख्यात संगीत दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांच्या ‘वेडिंगचा शिनेमा’च्या टीमने केलेला हा प्रयोग याआधी कुठे झालेला नाही. या चित्रपटातील एक गाणे हे चक्क ऑनलाइन ऑडीशनच्या माध्यमातून गायकांची निवड करून ध्वनिमुद्रित केले जात आहे. देश आणि परदेशातील गायकांकडून मिळालेल्या प्रतिसादानंतर तब्बल ४१२ स्पर्धकांमधून दोघांची निवड करण्यात आली असून त्याचे ध्वनीमुद्रण लवकरच होणार आहे.


माजलगावचा सौरभ शिरसाठ आणि कोल्हापूरची स्वरूपा बर्वे यांची निवड या गाण्यासाठी केली गेली आहे. “कुनीबी कसबी घालुदे पिंगा, बाशिंगाचा कळतोच इंगा” असे बोल असलेले हे गाणे आहे. सलील कुलकर्णी यांनी हे बोल फेसबुकच्या माध्यमातून गेल्या आठवड्यात ऑनलाइन टाकले होते. त्यानंतर या गाण्याचे व्हीडिओ अपलोड करायचे आवाहन होतकरू गायकांना केले. त्याला देश आणि परदेशातून म्हणजे अगदी ओमान, बाहरीन, अमेरिका, कॅनडासारख्या देशांमधून आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश या राज्यांमधून आणि महाराष्ट्राच्या विविध भागांतून सर्व वयोगटातील होतकरू गायकांनी आपले व्हिडिओ अपलोड केले होते.

हा सिनेमा येत्या १२ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. चित्रपटाची तीन गाणी याआधीच प्रदर्शित करण्यात आली आहेत. या वेगळ्या प्रयोगाला मिळालेल्या उत्तुंग प्रतिसादाबद्दल डॉ. सलील कुलकर्णी यांनी समाधान व्यक्त केले आहे. सिनेमात शिवाजी साटम, अलका कुबल, मुक्ता बर्वे, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर या आघाडीच्या कलाकारांबरोबरच भाऊ कदम, प्रवीण तरडे, हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. आता सिनेमाच्या प्रमोशनसाठी वापरलेला हा फंडा सिनेमाला किती फायदेशीर ठरतो ते कळेलच, पण या दोघांनी गायलेलं गाणं सुपरहिट ठरलं तर ते त्यांच्या करिअरला कलाटणी देणारं असेल.

ABOUT THE AUTHOR

...view details