मुंबई- हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये रॉक आणि पॉप म्युझिकसाठी प्रसिद्ध असलेली गायिका म्हणजेच अलिशा चिनॉय. अलिशाचा आज ५४ वा वाढदिवस. ‘मेड इन इंडिया’ या गाण्याच्या अल्बममधील एका वेगळ्या प्रकारच्या गायनशैलीनं तिला संगीतक्षेत्रात एक वेगळीच ओळख निर्माण करून दिली. या अल्बमद्वारे तिने अनेकांची मने जिंकली.
B'day Spcl : पॉप सिंगर अलिशा चिनॉयची काही गाजलेली गाणी - singer
राजा हिंदुस्तानीमधील नाचेंगे, चंद्रमुखीमधील छा रहा हैं प्यार का नशा, सोना सोना रूप है, मौजे में, दे दिया, रुक रुक रुक (विजयपथ) ही तिची काही गाणी चांगलीच गाजली.
सध्या ती जास्त चर्चेत नसली तरीही तिची गाणी आजही प्रेक्षकांच्या ओठांवर असतात. राजा हिंदुस्तानीमधील नाचेंगे, चंद्रमुखीमधील छा रहा हैं प्यार का नशा, सोना सोना रूप है, मौजे में, दे दिया, रुक रुक रुक (विजयपथ) ही तिची काही गाणी चांगलीच गाजली.
चित्रपटविश्वात पदार्पण केल्यानंतर सुरुवातीला अलिशाने बप्पी लहिरी यांच्यासोबत काम केले. त्यानंतर बॉलिवूडच्या जवळपास सर्वच आघाडीच्या अभिनेत्रींसाठी अलिशाने गाणी गायली होती. ‘बंटी और बबली’ या चित्रपटातील ‘कजरा रे’ या गाण्यासाठी अलिशावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला होता. ९०च्या दशकात अलिशाने तेव्हाचे आघाडीचे संगीत दिग्दर्शक अनू मलिक, आनंद-मिलिंद, राजेश रोशन आणि नदीम-श्रवण यांच्याकरिता विविध बॉलीवूड चित्रपटांमध्ये गाणी गायली