मुंबई- मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ चांदेकरचा काही दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला. अभिनेत्री मिताली मयेकरसोबत तो लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अशात मितालीच्या वाढदिवसानिमित्त सिद्धार्थनं तिच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे.
आयुष्यात मी खूप काही चांगलं केलं असेल म्हणून तू भेटली, भावी पत्नीसाठी सिद्धार्थची पोस्ट - विवाहबंधन
मी खरंच काहीतरी फार चांगलं केलं असेन आयुष्यात, म्हणून तुला भेटायला मिळालं आणि जाणून घ्यायला मिळालं. जर का ह्याला नशीब म्हणतात...तर मी बेहद्द खूष आहे माझ्या नशिबावर, असं त्यानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

भाग्य आणि नशीब वगैरेवर माझा विश्वास नाहीये. मला कायम वाटतं, की आपण काही वाईट केलं, की आपल्याला वाईट मिळतं आणि आपण काही चांगलं केलं की आपल्याला खूप चांगलं मिळतं. मी खरंच काहीतरी फार चांगलं केलं असेन आयुष्यात, म्हणून तुला भेटायला मिळालं आणि जाणून घ्यायला मिळालं. जर का याला नशीब म्हणतात...तर मी बेहद्द खूष आहे माझ्या नशिबावर, असं त्यानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
सिद्धार्थ आणि मितालीचा फेब्रुवारी महिन्यात साखरपुडा झाला. हे दोघेही अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करताना दिसतात. त्यांच्या या फोटोंना चाहत्यांची चांगलीच पसंतीदेखील मिळते.