मुंबई - मराठी सिनेसृष्टीचा 'हॅन्डसम हंक' सिद्धार्थ चांदेकरची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवल्यानंतर आता छोट्या पडद्यावरही त्याने आगमन केले आहे. 'जिवलगा' या मालिकेतून तो घराघरात पोहोचला आहे. मात्र, या सर्वात त्याने चाहत्यांना एक धक्कादायक बातमी दिली आहे.
सिद्धार्थची अलिकडेच 'सिटी ऑफ ड्रिम्स' ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. या वेबसीरिजला चाहत्यांनीही भरभरून प्रतिसाद दिला. त्याच्या अभिनयाचे कौतुकही केले. मात्र, सिद्धार्थने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना काही महिन्यांसाठी 'गुड बाय' म्हटले आहे. होय, सिद्धार्थ काही काळापर्यंत सोशल मीडियापासून दुर जात आहे. 'तुम्हा सर्वांपासून मी १८ महिने दुर जात आहे. तोपर्यंत मला मिस करा, गुड बाय', असे कॅप्शन देत त्याने एक फोटो शेअर केला आहे.