मुंबई -चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारत बॉलिवूडचा खलनायक ठरलेला ‘क्राइम मास्टर गोगो’ अर्थात अभिनेता म्हणजेच शक्ती कपूर यांचा आज वाढदिवस आहे. चित्रपटांमध्ये अनेक वेळा खलनायकाची भूमिका साकारल्यामुळे शक्ती कपूर यांना 'बॅड बॉय' हे नाव मिळालं. चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेला एक वेगळी उंची गाठून दिल्यानंतर शक्ती कपूर यांनी विनोदी कलाकाराच्याही भूमिका अत्यंक खुबीने वठविल्या. त्यामुळेच त्यांची लोकप्रियता आजही कायम आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त श्रद्धा कपूरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
शक्ती कपूर यांचा आज ६७ वा वाढदिवस आहे. त्यांच्या भूमिकेचे विविध फोटो कोलाज करत श्रद्धाने एक पोस्ट शेअर केली आहे.
शक्ती कपूर यांनी ९० च्या दशकात बऱ्याच चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. आजही ते चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. मागच्याच वर्षी त्यांनी गोविंदासोबत 'रंगीला राजा' चित्रपटात भूमिका साकारली होती.