अमरावती - महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या बिग बॉस मराठी या लोकप्रिय शोचा आज महाअंतिम सोहळा पार पडला. या बहुचर्चित शोचा विजेता कोण ठरणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं. अखेर बिग बॉसच्या अंतिम टप्प्यात विदर्भाची वर्णी लागली आहे. अमरावतीच्या शिव ठाकरे याने दिग्गज स्पर्धकांना टक्कर देत बिग बॉसच्या विजेते पदाची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. त्याच्या विजयानंतर त्याच्या कुटुंबीयांशी आणि मित्रपरिवाराशी बातचीत केलीये आमच्या ई-टीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी....
अंबानगरीच्या शिव ठाकरेने जिंकली 'बिग बॉस मराठी २'ची ट्रॉफी, आनंदाने भारावले कुटुंबीय
शिवच्या विजयामुळे त्याच्या कुटुंबीयांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. त्याच्या यशाने त्याचे कुटुंबीय भारावून गेले आहेत. शिव लवकरच घरी परतणार असल्यामुळे त्याच्या कुटुंबाकडून त्याला खास सरप्राईझदेखील मिळणार आहे.
अंबानगरीच्या शीव ठाकरेने जिंकली 'बिग बॉस मराठी २'ची ट्रॉफी, आनंदाने भारावले कुटुंबीय
शिवच्या विजयामुळे त्याच्या कुटुंबीयांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. त्याच्या यशाने त्याचे कुटुंबीय भारावून गेले आहेत. शिव लवकरच घरी परतणार असल्यामुळे त्याच्या कुटुंबाकडून त्याला खास सरप्राईझदेखील मिळणार आहे.
हेही वाचा- बिग बॉस मराठी-२ महाअंतिम सोहळा: दिग्गजांवर मात करत शिव ठरला विजेता
Last Updated : Sep 2, 2019, 8:46 AM IST