मुंबई -बॉलिवूडची फिटेस्ट अभिनेत्री म्हणून शिल्पा शेट्टीची ओळख आहे. सोशल मीडियावर ती नेहमी फिटनेसचे धडे देताना दिसते. तसेच, तिचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ देखील शेअर करत असते. अलिकडेच तिने एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती चक्क पाण्यात स्टंट करताना दिसत आहे. विशेष म्हणजे तिला पोहता येत नाही. याचा खुलासा तिनेच या पोस्टमध्ये केला आहे.
पोहता येत नसतानाही शिल्पाने पाण्यात केला 'हा' स्टंट, व्हिडिओ व्हायरल - पोस्ट
शिल्पाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.
शिल्पा या व्हिडिओमध्ये स्विमिंग पूलमध्ये वॉटर थेरपी घेताना दिसत आहे. तिने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये लिहिलेय, की 'खरं सांगायचं तर मला पोहता येत नाही. मी खूपदा पोहण्याचा प्रयत्न केला. मात्र, मला ते जमले नाही. आज मात्र, मला आईच्या कुशीत असलेल्या बाळाप्रमाणे वाटले. माझ्या चेहऱ्यावरचे हास्य माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी पुरेसे आहे. पहिल्यांदाच आणि तेही कुणाच्यातरी मदतीने कोणत्याही भीतीशिवाय मी पाण्यात अशाप्रकारे वाटर थेरपी घेतली', असे तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे.
शिल्पाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.