पुणे - सिनेसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चनचे आपण सर्वच जण चाहते आहोत. अमिताभ बच्चन यांच्या प्रत्येक स्टाईलची कॉपी केली जाते. मात्र अमिताभ बच्चन यांच्या सारखे दिसणारे आणि अमिताभ सारखेच संवाद फेक करणारे शशिकांत पेडवाल आज सोशल मीडियावर खूप हिट झाले आहेत. सध्या टिक टॅकवर त्यांचा व्हिडीओ चांगलाच गाजतोय.
हुबेहुब अमिताभ शशिकांत पेडवाल हे जरी खरेखुरे अमिताभ बच्चन नसले तरी हुबेहूब अमिताभ बच्चनच्या आवाजात कविता सादर केलीय. हे आहेत शशिकांत पेडवाल मूळचे धुळ्याचे मात्र सध्या ते पुण्यात स्थायिक आहेत. त्यांनी तयार केलेला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय.
शशिकांत हे सध्या लोणावळा येथे आयटीआयमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरीला आहेत, मात्र कॉलेज जीवनापासून ते अमिताभ बच्चनची मिमिक्री करतायत. ज्यामुळे सध्या त्यांना खूपच भाव आलाय आहे.
शशिकांत आज देश विदेशात अनेक ठिकाणी जाऊन अमिताभ बच्चनची मिमिक्री करून लोकांचे मनोरंजन करतायत. त्यांनी खुद्द अमिताभ बच्चनची ही भेट घेतली त्यावेळी अमिताभ बच्चन यांनीही त्यांचे कौतुक केले होते.
शशिकांत आज 10 वर्षांपेक्षाही जास्त बच्चन यांची मिमिक्री करतायत. मात्र आपणही कोण बनेगा करोडपती यासारख्या एखाद्या शोची अँकरिंग करू शकतो, असं शशिकांत यांना वाटतंय. ते त्या संधीची वाट बघतायत. मात्र थेट अमिताभ बच्चनला जरी आपण भेटू शकलो नसलो तरी शशिकांत पेडवाल यांना भेटून नक्कीच तुम्हाला अमिताभ बच्चनला भेटण्याचा आनंद मिळणार हे निश्चित.