मुंबई - अभिनेता शाहिद कपूर 'जर्सी' चित्रपटाच्या सेटवर जखमी झाला होता. त्याच्या डोक्याला बॉल लागल्यामुळे त्याला टाके बसले आहेत. त्यामुळे तो पत्नी मीरासोबत मुंबईला परत आला आहे. त्याला मुंबई विमानतळावर मीरासोबत स्पॉट करण्यात आले.
शाहिदच्या ओठांवर जखम झाल्यामुळे त्याने आपल्या चेहऱ्यावर मास्क घातले होते. घरी परतल्यानंतर त्याने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहे.
सुत्रांच्या अनुसार, शाहिद 'जर्सी'च्या शूटिंगदरम्यान क्रिकेटची तयारी करत होता. तेव्हा त्याला अचानक बॉल लागला. त्याच्यावर लगेच उपचार करण्यात आले. मात्र, ओठांना टाके लागल्यामुळे त्याला डॉक्टरांनी विश्रांती घेण्यास सांगितले आहे. शाहिदची पत्नी मीरा त्याला भेटण्यासाठी चंदिगढ येथे गेली होती. तिच्यासोबत तो मुंबईत परत आला.
हेही वाचा -पंतग महोत्सवात सहभागी झाले वरुण - श्रद्धा, 'स्टीट डान्सर'चं केलं प्रमोशन
'जर्सी' हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपट 'जर्सी'चा रिमेक आहे. गौतम तिन्नाऊरी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हिंदी व्हर्जनचेही दिग्दर्शन तेच करत आहेत. अमन गील आणि दिल राजू हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.