महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

श्रेयस तळपदेच्या 'सेटर्स' चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित - ishita dutta

श्रेयस तळपदे, आफताब शिवदासनी आणि विजयराज यांच्या आगामी 'सेटर्स' चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. तसेच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहिर करण्यात आली आहे.  या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता आफताब शिवदासनी हा तब्बल दीड वर्षानंतर पडद्यावर झळकणार आहे.

सेटर्स

By

Published : Mar 8, 2019, 9:24 PM IST


मुंबई - श्रेयस तळपदे, आफताब शिवदासनी आणि विजयराज यांच्या आगामी 'सेटर्स' चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. तसेच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहिर करण्यात आली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता आफताब शिवदासनी हा तब्बल दीड वर्षानंतर पडद्यावर झळकणार आहे.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाचे पोस्टर ट्विटरवर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये चित्रपटातील सर्व स्टारकास्ट दिसत आहे.


'सेटर्स' चित्रपट हा एक थ्रिलरपट असणार आहे. या चित्रपटात तनुश्री दत्ताची बहीण इशिता दत्तादेखील झळकणार आहे. तिनेही तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या चित्रपटात ती मुख्य भूमिका साकारणार आहे. 'आता प्रत्येक गोष्टीचा उलगडा होणार कारण 'सेटर्स' त्यांच्या रस्त्यांवर आहेत', असे कॅप्शन तिने या फोटोवर दिले आहे.
या चित्रपटाचे शूटिंग मुंबई, जयपूर आणि दिल्ली या ठिकाणी झाले आहे. सुरुवातीला या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख १ मार्च ठेवण्यात आली होती. मात्र, आता हा चित्रपट १२ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


या चित्रपटाचे संगित सलीम-सुलेमान यांनी दिले आहे. तर, दिग्दर्शन अश्विनी चौधरी करत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details