महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'डॉक्टर स्ट्रेंज'च्या दिग्दर्शकला पडली 'बाहुबली २' च्या 'या' सीनची भुरळ - बाहुबली

हॉलिवूडचे ख्यातनाम दिग्दर्शक स्कॉट डेरिक्सन यांनी बाहुबली चित्रपटातील एक सीन ट्विटरवर शेअर केलाय. या व्हिडिओवर जगभरातून प्रतिक्रियांचा पाऊस पडलाय.

बाहुबली २

By

Published : Aug 8, 2019, 8:07 PM IST

मुंबई - दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांचा बाहुबली या भारतीय चित्रपटाने इतिहास रचला होता. आता या चित्रपटाची भुरळ जगभरातील सिने दिग्दर्शकांनाही पडली आहे. हॉलिवूडचे ख्यातनाम दिग्दर्शक स्कॉट डेरिक्सन यांनी बाहुबली चित्रपटातील एक सीन ट्विटरवर शेअर केलाय. मार्वलचा ब्लॉबस्टर 'डॉक्टर स्ट्रेंज' या चित्रपटाचे ते दिग्दर्शक आहेत.

दिग्दर्शक स्कॉट डेरिक्सन यांनी शेअर केलेल्या बाहुबलीच्या या सीनमध्ये महेंद्र बाहुबली ( प्रभास ) भल्लालदेवच्या किल्ल्यावर झाडाचा वापर करुन हल्ला चढवतो. ज्या प्रकारे तो किल्ल्यावर पोहोचतो, त्यात दाखवण्यात आलेले हे तंत्र अफलातून आहे.

या व्हिडिओवर प्रतिक्रियांचा पाऊस पडलाय. "मी बाहुबलीचे दोन्ही भाग सलग पाहिले. प्रामाणिकपणे सांगतो मला खूप आवडले. निखळ मनोरंजनाचे हे दोन भाग काळजाला भिडणारे होते," असे एका युजरने म्हटलंय.

कॅनडाचा एक दर्शक म्हणतो, "मला दोन्ही भाग आवडले. दोन वर्षापूर्वी जेव्हा नेटफ्लिक्स कॅनडावर आले होते तेव्हा भारवून गेलो होतो. माझ्या सर्व मित्रांना मी हे पाहायला सांगणार आहे."

ABOUT THE AUTHOR

...view details