महाराष्ट्र

maharashtra

११ ते १५ डिसेंबर दरम्यान रंगणार 'सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव'

By

Published : Nov 19, 2019, 7:52 PM IST

या महोत्सवात देशभरातील दिग्गज कलाकारांबरोबरच युवा पिढीतील कलाकार, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलाकार यांबरोबरच परदेशी कलाकाराचा समावेश राहणार आहे.

११ ते १५ डिसेंबर दरम्यान रंगणार 'सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव'

पुणे -आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारा ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ यावर्षी ११ डिसेंबर १५ डिसेंबर दरम्यान मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल येथे होणार आहे. यंदा महोत्सवाचे हे ६७ वे वर्ष आहे. या महोत्सवात तब्बल २९ कलाकार आपली कला सादर करतील.

या महोत्सवात देशभरातील दिग्गज कलाकारांबरोबरच युवा पिढीतील कलाकार, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलाकार यांबरोबरच परदेशी कलाकाराचा देखील समावेश असल्याची माहिती श्रीनिवास जोशी यांनी दिली.

'सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव'

हेही वाचा -'स्वराज्यजननी जिजामाता' मालिका ओलांडणार मोठा टप्पा, जिजाऊ आईसाहेब आणि शहाजी राजाचं मोठेपणीच रूप येणार प्रेक्षकांसमोर

११ डिसेंबर रोजी सवाई गंधर्व यांचे ज्येष्ठ शिष्य आणि किराणा घराण्याचे जेष्ठ गायक पं. फिरोज दस्तूर यांचे शिष्य गिरीश संझगिरी यांच्या गायनाने सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला सुरुवात होईल. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा समारोप परंपरेप्रमाणे किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनाने १५ डिसेंबर रोजी होईल.

'सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव'

हेही वाचा -'दोन स्पेशल' कार्यक्रमात प्रशांत दामले - कविता लाड उलगडणार रंगतदार किस्से

यंदाच्या महोत्सवात संदीप भट्टाचार्जी, मनोज केडिया आणि मोर मुकुट केडिया (केडिया ब्रदर्स), अमिता सिन्हा महापात्रा, जान्हवी फणसळकर व अनुजा बोरुडे (धृपद सिस्टर्स), विराज जोशी, ओंकारनाथ हवालदार, तेजस उपाध्ये, स्वामी कृपाकरानंद, रीला होता, अतुल खांडेकर, रुचिरा केदार हे कलाकार पहिल्यांदाच आपली कला सादर करणार आहेत.

'सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव'

ABOUT THE AUTHOR

...view details