महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'स्विटहार्ट' गाण्यावरील साराचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल - रांझणा

साराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिचा धमाल डान्स पाहायला मिळतोय. 'हमारा पेहला गाणा...', असं कॅप्शन देत तिने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

'स्विटहार्ट' गाण्यावरील साराचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

By

Published : Sep 10, 2019, 9:32 PM IST

मुंबई -अभिनेत्री सारा अली खानने अल्पावधीतच आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. 'केदारनाथ' चित्रपटातून तिने सुशांत सिंग राजपूतसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. शिवाय, साराच्या अभिनयाचंही भरभरुन कौतुक झालं. याच चित्रपटातील 'स्विट हार्ट' गाण्यावरील साराचा डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

साराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिचा धमाल डान्स पाहायला मिळतोय. 'हमारा पेहला गाणा...', असं कॅप्शन देत तिने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

हेही वाचा-'ड्रीमगर्ल'ला भेटण्यास मुन्नाभाई उत्सुक, प्रपोजचा व्हिडिओ व्हायरल

'केदारनाथ' चित्रपटानंतर साराने 'सिंबा' चित्रपटात भूमिका साकारली होती. या चित्रपटाने १०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. आता ती कार्तिक आर्यन सोबत 'आजकल' या चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट 'लव्ह आज कल' या चित्रपटाचा सिक्वेल आहे.

याशिवाय, ती वरुण धवनसोबत 'कुली नंबर १'च्या रिमेकमध्ये आणि धनुषसोबतही 'रांझणा' चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये झळकणार आहे. पुढच्या वर्षी हे चित्रपट प्रदर्शित होतील.

हेही वाचा-सारा अली आणि धनुषची जोडी झळकणार 'रांझणा'च्या सीक्वेलमध्ये?

ABOUT THE AUTHOR

...view details