मुंबई -अभिनेता कार्तिक आर्यन आणि सारा अली खान दोघेही लवकरच एकत्र पडद्यावर पाहायला मिळणार आहेत. दिग्दर्शक इम्तियाज अलीच्या 'लव्ह आज कल' या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये दोघांची रोमँटिक केमेस्ट्री पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने कार्तिक आणि सारा पहिल्यांदाच एकत्र भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी ते दोघेही सध्या हिमाचल प्रदेश येथे गेले आहेत. तिथले काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सारा अली खान - कार्तिक आर्यनची धमाल मस्ती, फोटो व्हायरल - love aaj kal
सारा अली खानने करण जोहरच्या कॉफी विथ करण या शो मध्ये तिला कार्तिक आर्यनवर क्रश असल्याचे सांगितले होते. तेव्हापासून कार्तिक आणि साराला एकत्र पाहण्याची चाहत्यांची उत्सुकता होती.
सारा अली खान - कार्तिक आर्यनची धमाल मस्ती, फोटो व्हायरल
सारा अली खानने करण जोहरच्या कॉफी विथ करण या शो मध्ये तिला कार्तिक आर्यनवर क्रश असल्याचे सांगितले होते. तेव्हापासून कार्तिक आणि साराला एकत्र पाहण्याची चाहत्यांची उत्सुकता होती.
आता 'लव्ह आज कल'च्या सिक्वेलमध्ये दोघांना पाहता येणार आहे. हिमाचल प्रदेश येथे या चित्रपटाचे काही भाग शूट करण्यात येत आहेत. यावेळी दोघांचेही पारंपारिक वेशभूषेतील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये दोघेही एकमेकांसोबत खूपच सुंदर दिसत आहेत.