महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

...अन् कार्तिकसोबत डेटवर जाण्याची साराची इच्छा झाली पूर्ण - photos

कार्तिक आर्यनने 'प्यार का पंचनामा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटानंतर तो तरुणाईमध्ये विशेषत: तरूणींमध्ये चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाऊ लागला. सारानेही त्याच्यासोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती

कार्तिकसोबत डेटवर जाण्याची साराची इच्छा झाली पूर्ण

By

Published : Mar 28, 2019, 9:55 PM IST

मुंबई -बॉलिवूडमध्ये आपल्या पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांवर छाप पाडणारी सारा अली खान अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. 'केदारनाथ' आणि 'सिम्बा' चित्रपटानंतर तिच्याकडे बऱ्याच चित्रपटांच्या ऑफर्स आहेत. काही दिवसांपूर्वीच करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये तिने अभिनेता कार्तिक आर्यनसोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. तिची ही इच्छा पूर्ण झाली आहे.

कार्तिक आर्यनने 'प्यार का पंचनामा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटानंतर तो तरुणाईमध्ये विशेषत: तरूणींमध्ये चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाऊ लागला. सारानेही त्याच्यासोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे कार्तिक आर्यन चर्चेत आला होता. दोघेही सध्या 'लव्ह आज कल' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. त्यानिमित्त दोघेही सध्या एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत.



अलिकडेच या दोघांचेही काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सारा अली खाननेही एक व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. नुकतेच त्यांनी दिल्ली येथील शूटिंग संपविले आहे.

दुसरीकडे कार्तिक आर्यन चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. दोघेही आगामी 'पती पत्नी और वो' चित्रपटात भूमिका साकारत आहेत. अनन्या लवकरच टायगर श्रॉफसोबत 'स्टुंडंट ऑफ द ईयर-२' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details