मुंबई- सारागढीच्या लढाईवर आधारित 'केसरी' या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ज्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. यापाठोपाठ आता चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.
'केसरी' चित्रपटातील पहिलं गाणं 'सानू केहंदी' प्रेक्षकांच्या भेटीस
'सानू केहंदी' असं या गाण्याचं शीर्षक आहे. या गाण्यात शीख रेजिमेंटच्या सैनिकांचा खास डान्सही प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.
'सानू केहंदी' असं या गाण्याचं शीर्षक आहे. या गाण्यात शीख रेजिमेंटच्या सैनिकांचा खास डान्सही प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. गणेश आचार्य यांनी या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. तर गाण्याला रोमी आणि ब्रिजेश शांडिल्य यांनी आवाज दिला असून हा आवाज प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा आहे.
'केसरी' चित्रपटात त्या २१ शीख सैनिकांची कथा दाखविण्यात येणार आहे, ज्यांनी हार पत्करण्यापेक्षा लढून मृत्यूस सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आणि २१ शीख सैनिकांनी सुमारे १० हजार अफगाणांसोबत लढाई केली. अनुराग सिंग यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. येत्या २१ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.