मुंबई -बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि 'ईद'चा मुहूर्त हे वर्षानुवर्षापासून जुळत आलेलं एक समीकरणंच आहे. दरवर्षी 'ईद'च्या मुहूर्तावर त्याचे चित्रपट प्रदर्शित होत असतात. 'ईद'च्या दिवशीचा मुहूर्त हा सलमानच्या चित्रपटांसाठी ठरलेला असतो म्हणून शक्यतो इतर अभिनेत्यांचे चित्रपट या दिवशी प्रदर्शित होत नाहीत. मात्र, पुढच्या वर्षीची 'ईद' ही भाईजानच्या चित्रपटाशिवायच साजरी होणार असल्याचे दिसतेय. याचा खुलासा खुद्द सलमान खाननेच केला आहे.
सलमान खान आणि आलिया भट्ट यांची जोडी असलेला 'ईन्शाल्ला' हा चित्रपट पुढच्या वर्षी 'ईद'च्या दिवशी प्रदर्शित होणार होता. दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्यासोबत सलमान खान पुन्हा या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येत आहे. त्यामुळे हा चित्रपट त्याच्यासाठी खूप महत्वाचा आहे. मात्र, आता हा चित्रपट ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार नसल्याचे सलमान खानने सांगितले आहे.