मुंबई - सलमान खान - कॅटरिना कैफ यांची जोडी असलेल्या 'भारत' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर घोडदौड कायम आहे. 'ईद'च्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
अगदी पहिल्या दिवसापासूनच कमाईचे उच्चांक गाठणाऱ्या भारतने आत्तापर्यंत १५० कोटीपेक्षाही अधिक गल्ला जमवला आहे. आता प्रदर्शनानंतर 'भारत' चित्रपटाचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
सलमान खानच्या 'भारत'चं नवं गाणं प्रदर्शित, बॉक्स ऑफिसवर घोडदौड कायम - collection
ईद'च्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अगदी पहिल्या दिवसापासूनच कमाईचे उच्चांक गाठणाऱ्या भारतने आत्तापर्यंत १५० कोटीपेक्षाही अधिक गल्ला जमवला आहे.
वडिलांना दिलेले वचन पाळण्यासाठी 'भारत' म्हणजेच सलमान खान कशाप्रकारे मेहनत घेतो. त्यासाठी त्याला कशाप्रकारे पाच रुपे साकारावी लागतात. शेवटपर्यंत तो आपले वडिल परत येण्याची वाट पाहतो. अशाच आशयाचे भावनिक गाणे 'आया ना तू' हे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला प्रदर्शित होताच चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.
वडील आणि मुलगा फाळणीच्या वेळी एकमेकांपासून वेगळे होतात. त्यांतर आयुष्याच्या उतारवयापर्यंत 'भारत' त्याच्या वडिलांना दिलेले वचन पाळत असतो आणि त्यांच्या येण्याची वाट पाहत असतो. हेच या गाण्यात दाखवले आहे.
'भारत' चित्रपटाला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. आता या चित्रपटाच्या कमाईत आणखी किती भर पडते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.