मुंबई - यंदाच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये सलमान खानच्या 'भारत' चित्रपटाने स्थान पटकावले आहे. पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करून नंतरही या चित्रपटाने बरेच विक्रम आपल्या नावी केले होते. या चित्रपटात सलमान खान आणि दिशा पटाणीची जोडी पाहायला मिळाली होती. दिशाने पहिल्यांदाच या चित्रपटात त्याच्यासोबत स्क्रिन शेअर केली होती. आता पुन्हा एकदा सलमान खानसोबत तिची वर्णी लागली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या जोडीला पडद्यावर एकत्र पाहता येणार आहे.
'राधे' असं या चित्रपटाचं नाव असणार आहे. प्रभू देवा या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. प्रभू देवासोबतही सलमान खानचा हा तिसरा चित्रपट आहे. यापूर्वी प्रभू देवा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'वान्टेड' आणि आता लवकरच प्रदर्शित होणाऱ्या 'दबंग ३' मध्ये सलमानने भूमिका साकारल्या आहेत. आता 'राधे' चित्रपटाच्या निमित्ताने तो पुन्हा एकदा प्रभू देवासोबत काम करणार आहे.
हेही वाचा -प्रथमेश परब सिनेमासाठी होणार 'टल्ली'