मुंबई- बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या जीवनावर आधारित बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या बायोपिकमध्ये श्रद्धा कपूर ही सायना नेहवालच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येच सुरूवात झाली. अशात श्रद्धा या सिनेमाला आणि त्यातील भूमिकेला योग्य न्याय देईल, असा विश्वास आता सायना नेहवालने व्यक्त केला आहे.
श्रद्धा माझ्या भूमिकेला योग्य न्याय देईल; सायना नेहवालने व्यक्त केला विश्वास - player
चित्रपटामध्ये बॅडमिंटन खेळाडू इशान नक्वी सायनाच्या प्रियकराची भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जात आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल गुप्ते करणार असून भूषण कुमार यांची निर्मिती आहे.
श्रद्धाने चित्रपटातील आपल्या भूमिकेसाठी विशेष कष्ट घेतले आहेत. यासाठी तिने अनेक दिवस हॉकीचं प्रशिक्षणही घेतलं. याबद्दल बोलताना सायना म्हणाली, मी या चित्रपटासाठी खूप उत्साहित आहे. श्रद्धा कपूर या सिनेमाला नक्कीच न्याय देईल याची मला खात्री आहे आणि यासाठी ती प्रचंड मेहनत घेत असल्याचं सांगत चित्रपटाची आपण आतुरतेने वाट पाहत असल्याचे सायनाने म्हटले आहे.
श्रद्धाचा सायनाच्या भूमिकेतील लूकही काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. चित्रपटामध्ये बॅडमिंटन खेळाडू इशान नक्वी सायनाच्या प्रियकराची भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जात आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल गुप्ते करणार असून भूषण कुमार यांची निर्मिती आहे.